अभिनेत्री सई ताम्हणकरने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. सईने अभिनयाच्या जोरावर मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही जम बसवला. अभिनयाचा ठसा उमटवत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सईने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी सईने थाई हाई स्लिट स्कर्ट व डिझायनर टॉपमध्ये ग्लॅमरस लूक केला होता. या ड्रेसमधील काही फोटो सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. फोटोशूटसाठी सईने हटके पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. यातील एका फोटोत सईने खाली वाकून फोटोसाठी पोझ दिली आहे. पण, सईच्या या फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सईच्या फोटोशूटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “पैसे उचलताना गुडघा चमकला काय”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “खाली पडलेले पैसे असे कोणी कोणी उचलले आहेत”, अशी कमेंट केली आहे. “हा कोणता प्रकार आहे”, अशी कमेंटही एकाने केली आहे. तर एका नेटकऱ्याने सईची तुलना थेट सनी लिओनीशी केली आहे. “गरीबांची सनी लिओनी”, असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

sai tamhankar

सईने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह तिने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे.