मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या नव्या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. ‘क्राइम बीट’ असं सईच्या नव्या सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये सई अभिनेता साकिब सलीम, सबा आझाद, आदिनाथ कोठारे यांच्यासह झळकली आहे. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सईची नवीन वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. दुसऱ्या बाजूला सईने तीन व्यक्तींना किडनॅप करण्याची इच्छा व्यक्त केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्याला सई ताम्हणकरने खास उपस्थिती लावली होती. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये सई या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाली. यावेळी सईने कोणत्या तीन व्यक्तींना किडनॅप करावंस वाटतं? याबद्दल सांगितलं.

सई ताम्हणकरला हॉलीवूड अभिनेता जेक जिलएनहॉल, अभिनेता आदर्श गौरव आणि मॅनेजर संतुष्टिला किडनॅप करण्याची इच्छा आहे. यामागचं कारण सांगत सई म्हणाली की, या तीन माझ्या आवडत्या व्यक्ती आहे. माझी मॅनेजर खूप व्यग्र झालीये. त्यामुळे मला तिला किडनॅप करून कुठेतरी घेऊन जायचं आहे.

पुढे सईला तिच्या आवडी-निवडीबाबत विचारण्यात आलं. सईला विचारलं की, तुझा आवडता पदार्थ कोणता? तर अभिनेत्री म्हणाली, “पोळी भाजी.” त्यानंतर सईला आवडता अभिनेता व अभिनेत्रीबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “विकी कौशल, प्रियांका चोप्रा.” तसंच सईचा आवडता चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया लै जायेंगे’. शिवाय तिचा आवडता छंद स्वयंपाक बनवणं आहे.

दरम्यान, सई ताम्हणकरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘नेटफ्लिक्स’च्या ‘डब्बा कार्टेल’ वेब सीरिजमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय सईचा ‘गुलकंद’ नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटात सई समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे, तेजस राऊत, जुई भागवत, वनिता खरात यांच्याबरोबर पाहायला मिळणार आहे. १ मेला सईचा ‘गुलकंद’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.