मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त स्वत:चे वेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, श्रेया बुगडे, अनघा अतुल, सुप्रिया पाठारे, महेश मांजरेकर, निरंजन कुलकर्णी अशा लोकप्रिय कलाकारांनी गेल्या काही दिवसांत कपडे, दागिने व हॉटेल अशा विविध व्यवसायात पदार्पण केलं आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या आर्ची-परश्याच्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मुख्य जोडीप्रमाणे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला घराघरांत लोकप्रिय मिळाली. परश्याच्या मित्रांच्या भूमिकेत असणारे अरबाज शेख व तानाजी गालगुंडे देखील या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आले होते. ‘सैराट’मधील भूमिकेमुळे या दोघांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

हेही वाचा : लगीनघाई! भगरे गुरुजींच्या लेकीने केलं तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडकेचं केळवण, फोटो शेअर करत म्हणाली…

‘सैराट’नंतर अरबाज शेखने ‘घर बंदूक बिर्याणी’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आता तो वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. अरबाजने पुण्यात स्वत:चा नवीन कॅफे सुरू केला आहे. याबद्दलचा खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याच्या कॅफेला स्वत: दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण, आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’

‘बेक बडीज’ असं अरबाजच्या नवीन कॅफेचं नाव आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या कॅफेची पहिली झलक नेटकऱ्यांनी दाखवली. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजसमोर अरबाजने हे नवीन कॅफे सुरू केलं आहे. सध्या मराठी कलाविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader