नागराज पोपटराव मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवला. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. या चित्रपटामुळे सिनेसृष्टीला रिंकू राजगुरू, आकाश ठोसरे यांच्यासारखे नवोदित कलाकार भेटले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता तानाजी गालगुंडे. तानाजीने साकारलेल्या बाळ्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आजही त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं जातं. या चित्रपटामुळे इतरांप्रमाणे तानाजीचं देखील आयुष्य बदललं.
सर्वसामान्य घरातून आलेला तानाजीने संधी सोनं केलं. ‘सैराट’नंतर त्याने काही चित्रपटांमध्ये काम केलं. ‘घर बंदुक बिरयानी’, ‘झुंड’, ‘भिरकीट’, ‘एकदम कडक’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकतीच त्याने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने बालपणापासून ते ‘सैराट’नंतरचा स्ट्रगल काळ सांगितला. शिवाय तानाजीने त्याच्या जिवालियाविषयी सांगितलं.
हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; अलीकडेच सुयश टिळकची मालिकेत झाली होती एंट्री
तानाजीची ही जिवालिया म्हणजे पांढरी गाय. आपल्या बालपणाविषयी सांगताना त्याने या गायीबरोबर असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “बालपण खूप मजेशीर होतं. जेव्हा आपण शेतकरी कुटुंबात जगतो ना त्यावेळेस मजेशीरच असतं. गुरं-ढोरं, शेती, पीक, फळं, सगळं काही इतकं मजेशीर असता ना. माझ्याकडे एक गाय आहे, मी तिला जिवालिया म्हणतो. जिवालिया म्हणजे लय जवळची. खरंतर ती मला लॉकडाऊनमध्ये भेटली. माझ्या मित्रापाशी ती होती. मी त्याच्याकडून ती गाय मागितली. कारण मला पांढरी गाय घ्यायची होती. त्यामुळे तो लगेच म्हणाला जा घेऊन. मी तिला घरी आणलं.”
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक, म्हणाल्या, “जमलं तर मला माफ कर कारण…”
“लॉकडाऊनचा काळात मी सहा महिने घरी होता. त्या दिवसात आम्हाला इतका एकमेकांचा जिव्हाळा लागला. मी आता दोन-तीन महिन्यांनी घरी गेलो, तर ती लगेच शांत उभी राहते. एकतर पांढरी गाय, पांढरे बैले असतात ते हात लावून देत नाहीत. पण आमच्यामधलं इतकं रिलेशन भारी आहे. मी दिसलो की, ती शिंग घालवते. जेणेकरून मी तिच्या जवळ गेलं पाहिजे, तिला खाजवलं पाहिजे. गळ्यावरून हात फिरवला पाहिजे,” असं तानाजी म्हणाला.