‘सैराट’, ‘न्यूड’ आणि ‘अंधाधुन’सारख्या नावाजलेल्या चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या मराठी अभिनेत्री छाया कदम यांच्या आईचं निधन झालं आहे. छाया यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आईच्या निधनाबद्दल माहिती दिली. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली.

“मी स्वार्थी होतो”, डिंपल कपाडिया वेगळ्या राहू लागल्यावर राजेश खन्नांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “ती दिवस-रात्र…”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

छाया यांनी आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला भावुक कॅप्शन दिलं आहे. “आई आज दोन आठवडे झाले तुला जाऊन? नाही अगं, तू आहेस आणि असशील. कायमच माझ्यासोबत. तू असशील मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई आणि जात्यात. तू असशील गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडात. आणि तू असशील, तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यात आणि माझ्या कामात, मिस यू मम्मुडी. लव्ह यू मम्मुडी!” असं छाया यांनी लिहिलं आहे.

दोन आठवड्यांपूर्वी छाया यांना मातृशोक झाला. त्यांनी या फोटोबरोबर लिहिलेल्या कॅप्शनमधून आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेक कलाकार छाया यांच्या पोस्टवर कमेंट करून त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री ईशा केसकर, अश्विनी कासार यांनी छाया यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, छाया कदम यांनी फक्त मराठीच नव्हे तर सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘झुंड’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

Story img Loader