Sairat Fame Marathi Actor Tanaji Galgunde : २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. त्यांनी आर्ची व परश्या या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात परशाच्या मित्रांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांनी लक्ष वेधून घेतले होते. परश्याच्या ‘लंगड्या’ नावाच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता तानाजी गळगुंडे दिसला होता. तानाजी सध्या त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे.

तानाजी गळगुंडेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी रिपोस्ट केली आहे. ती मूळ स्टोरी प्रतिक्षा शेट्टी नावाच्या मुलीने पोस्ट केली आहे. स्टोरीतील फोटोमध्ये प्रतिक्षाने काढलेल्या सेल्फीमध्ये तानाजीदेखील दिसत आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना असं कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये Entering 2025 with असं लिहून पुढे रेड हार्ट इमोजी पोस्ट केलेला आहे. तानाजीने रिपोस्ट केलेली ही स्टोरी व्हायरल झाली असून ही त्याची गर्लफ्रेंड आहे, अशी चर्चा होत आहे.

Happy New Year budget collection
९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ बॉलीवूड चित्रपट?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Amitabh bachchan post about ratan tata death
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
kanguva actor surya and jyothika in shaitan
३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
kokan hearted girl ankita walawalkar angry on false claim
“खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

हेही वाचा – ‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…

तानाजीने वेरुळमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्याच्याबरोबर प्रतिक्षादेखील होती. दोघांनीही वेरुळमधील काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. तानाजीबरोबर फोटोत असलेली प्रतीक्षा शेट्टी हिचा होममेड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. तसेच ती कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग, फोटोशूटही करते असं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसत आहे. एका मुलीबरोबर पाच-सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तानाजीने सांगितलं होतं. स्टोरीमधील या फोटोचं कॅप्शन पाहून हिच तानाजीची गर्लफ्रेंड आहे, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?

पाहा फोटो –

actor tanaji galgunde with girlfriend
तानाजी गळगुंडेने रिपोस्ट केलेली स्टोरी

तानाजीने एका मुलाखतीत त्याची गर्लफ्रेंड आहे असं सांगितलं होतं. पाच-सहा वर्षांपासून तिच्यासोबत असल्याचं तानाजीने सांगितलं होतं. जातव्यवस्थेवर भाष्य करताना तानाजीने त्याचं स्वतःचं उदाहरण दिलं होतं. “माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीतली आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी जातीवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. नात्याला पाच-सहा वर्षे झाली पण मी घरी काहीच सांगितलं नाही. आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना ते पटणार नव्हतं,” असं तानाजी म्हणाला होता.

गर्लफ्रेंडने हट्ट केल्याने आईला तिच्याबद्दल सांगितलं. पण आईला समजल्यावर ती खूप भांडली. याउलट त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरचे पुढारलेले असून त्यांना या नात्याबद्दल काहीच आक्षेप नसल्याचं तानाजीने ‘आरपार’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader