‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली. आजही प्रेक्षक तिला आर्ची या नावाने ओळखतात. चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकूची क्रेझ कायम आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच रिंकूने जळगाव येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीतून बाहेर जाताना रिंकूचा हात खेचल्यामुळे ती काहीशी संतप्त झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. परंतु, आता घडल्याप्रकारबद्दल अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या कार्यक्रमस्थळी नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव येथे महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा जल्लोषात समारोप करण्यात आला. या सोहळ्याला अभिनेत्री रिंकू राजगुरुने खास उपस्थिती लावली होती. लाडक्या आर्चीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एबीपी माझाच्या वृत्तवाहिनीवर हा संपूर्ण व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा : “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, ‘संघर्षयोद्धा’चा टीझर प्रदर्शित, मनोज जरांगे पाटलांची भूमिका कोण साकारणार?

कार्यक्रमातून बाहेर पडत असताना तेथील एकाने अभिनेत्रीचा हात खेचला. त्यामुळे “या जागी तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का?” असा सवाल तिने संबंधिताला केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रिंकूने याबाबत “माझा हात खेचल्यामुळे एका representative शी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते.” अशी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

हेही वाचा : सलमान खानला उचलू शकला नाही अनंत अंबानी, शेराला हाक मारली अन्…, प्री वेडिंगमधील ‘तो’ Video Viral

दरम्यान, रिंकू राजगुरुच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने तानिया ही भूमिका साकारली आहे. याशिवाय आजवर तिने ‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘झुंड’ असा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame rinku rajguru gets mobbed by fans in jalgaon actress reacts sva 00