‘सैराट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत प्रेक्षकांना तिच्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू(Rinku Rajguru). ‘सैराट’ चित्रपटातून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०१९ ला प्रदर्शित झालेला ‘कागर’, ‘२०० हल्ला हो’ (२०२१), ‘अनकहीं कहाँनिया’ (२०२१), ‘झुंड’ (२०२२), ‘झिम्मा २’ (२०२३) अशा उत्तमोत्तम चित्रपटांत काम करत रिंकू राजगुरूने स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता अभिनेत्री एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जिजाई’ असे या चित्रपटाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. नुकताच जिजाईचा मुहूर्त पार पडल्याचे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमधून दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जिजाई’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला. झी स्टुडिओज व कोकोनट फिल्म्स यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिंकू राजगुरू हातात जिजाई चित्रपटाच्या मुहूर्ताची पाटी घेऊन उभी असलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत झी स्टुडिओजने कॅप्शनमध्ये लिहिले, “शुभारंभ झाला, आता आपला आशीर्वाद असू द्या! झी स्टुडिओज व कोकोनट फिल्म घेऊन येत आहेत रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला, नवा कोरा मराठी सिनेमा ‘जिजाई.’” या पोस्टमध्ये रिंकूला टॅग केले आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

इन्स्टाग्राम

नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित ‘जिजाई’ चित्रपटात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर अपूर्वा शालीग्राम चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळे नाते निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, “झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदित कलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.”

हेही वाचा: Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

दरम्यान, रिंकू राजगुरू चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. आता रिंकूच्या या नवीन चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame rinku rajguru has announced a new film jijai shares photo from the set popular marathi actress nsp