अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने आर्ची हे मुख्य पात्र साकारलं होतं. नुकतीच रिंकू हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकली होती. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रिंकूने अलीकडेच नववर्षाचं औचित्य साधत इन्स्टाग्रामवर खास ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं.

रिंकूला इन्स्टाग्राम आस्क मी सेशनमध्ये तिच्या चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले होते. यात एका चाहत्याच्या प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. “तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?” असा प्रश्न रिंकूला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “बॉयफ्रेंड नाही…नावही नाही” यामुळे अभिनेत्री सध्या कोणालाही डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकर – सई ताम्हणकरच्या अरेंज लव्हस्टोरीची भन्नाट गोष्ट! बहुचर्चित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

रिंकूला आणखी एका चाहत्याने “तू तेलुगू चित्रपटात केव्हा काम करणार?” असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्रीने “मला खरंच तेलुगू चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. ही संधी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.” असं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा : ‘का रे दुरावा’नंतर सुरुची अडारकरचं तब्बल ८ वर्षांनी ‘झी मराठी’वर पुनरागमन! ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारणार भूमिका

rinku
रिंकू राजगुरु

दरम्यान, इन्स्टाग्राम आस्क मी सेशनमध्ये रिंकूने तिच्या खऱ्या नावाचा देखील खुलासा केला होता. अभिनेत्रीचं रिंकू हे टोपणनाव असून तिचं खरं नाव प्रेरणा राजगुरु आहे असं तिने चाहत्याला सांगितलं. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रिंकू शेवटची ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने निमिर्ती सावंत यांची सूनबाई ‘तानिया’ची भूमिका साकारली होती.

Story img Loader