आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता? त्याला काय आवडतं? काय नाही? असं सर्व काही जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. त्यामुळे कलाकार मंडळी देखील सोशल मीडियावर आपले बालपणीचे गोड फोटो आणि आपल्या आवडीनिवडी शेअर करत असतात. सध्या एका गोड चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ही चिमुकली एका चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार झाली होती आणि सध्या ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. पाहा तुम्हालाही ओळखते का कोण आहे ही अभिनेत्री?
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ
नुकतंच या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिला आवडत्या पदार्थापासून बरंच काही चाहत्यांनी विचारलं. तिला बालपणीच्या एक फोटो एका चाहत्याने शेअर करण्यास सांगितला. तेव्हा त्या अभिनेत्री आपल्या बालपणीचा एक गोड फोटो शेअर केला; जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला नातेवाईक मारतात टोमणे; तिच्या आईला थेट फोन करून सांगतात…
ही गोड चिमुकली दुसरी कोणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार झालेली रिंकू राजगुरूचा हा बालपणीचा फोटो आहे. या फोटोमध्ये बालपणीची रिंकू उभं राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…
दरम्यान, रिंकूने ‘सैराट’ चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.