अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेतला. सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टला रिंकू गेली होती. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जेव्हा तुमच्या मनातली गोष्ट सांगायला शब्द सापडत नाहीत. तेव्हा संगीत तुमच्या मनातील गोष्ट सांगतं. माझा हा पहिलाच कॉन्सर्ट होता, ज्याचा अनुभव खूपच भारी होता,” असं कॅप्शन लिहित रिंकूने अरिजीत सिंहच्या लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: किली पॉलने गायलं ‘गुलाबी साडी’ गाणं, मराठी ऐकून थक्क झाले नेटकरी, म्हणाले, “महाराष्ट्रात ये…”

या व्हिडीओत, रिंकू अरिजीतच्या गाण्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. तिच्याबरोबर महेश मांजरेकरांची मानस कन्या गौरी इंगवले देखील पाहायला मिळत आहे. दोघी देखील अरिजीतच्या कॉन्सर्टमध्ये भारावून गेल्याच दिसत आहे.

हेही वाचा – “वेगळा प्रवास, वेगळी भूमिका अन्…”, सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर विशाखा सुभेदारची खास पोस्ट; म्हणाली…

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेसह एका चित्रपटाचं चित्रीकरण करताना दिसली होती. यावेळी रिंकू व सुबोधसह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील होती. त्यामुळे या त्रिकुटचा कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे? याची उत्सुकता रिंकूच्या चाहत्यांना लागली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fame rinku rajguru with gauri ingawale attend arijit singh live concert video viral pps