मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. दोघांनी आपल्याला दमदार अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या सखी-सुव्रत रंगभूमी गाजवतं आहेत. त्यांचं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक प्रेक्षकांच्या चांगलं पसंतीस पडलं आहे. याच नाटकाचे ठिकठिकाणी दौरे सुरू आहेत. त्यामुळे यामध्ये सखी-सुव्रत व्यग्र आहेत. पण या व्यग्र वेळेतही दोघांची एनर्जी तितकीच भारी आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या दोघांचा डान्स व्हिडीओ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सखी गोखलेने इन्स्टाग्रामवर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सखी नवरा सुव्रत जोशीबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या सोबतीला अभिनेता सुरज पारसनीस देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे तिघांनी पहाटे २ वाजता हा भन्नाट डान्स केला आहे. शाहरुख खानचं ‘लुट पुट गया’ गाण्यावर सखी, सुव्रत आणि सुरज थिरकले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…

हेही वाचा – “खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”

सखी, सुव्रत आणि सुरजच्या डान्स व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘वरवरचे वधू-वर’ नाटकाचा लेखक-दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. विराजसने लिहिलं की, अधून-मधून प्रयोग ही करताय ना? त्यावर सुव्रतने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. “तुम्हा सगळ्यांच्या एनर्जीला सलाम”, “कमाल”, “धमाल”, “जबरदस्त एनर्जी”, “भारी” अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”

दरम्यान, सखी गोखले आणि सुव्रत गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वरवरचे वधू-वर’ नाटकाव्यतिरिक्त दोघं बरीच काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वी सखी ‘अग्नी’ चित्रपटात झळकली होती. तसंच सुव्रतचं ‘ठकीशी संवाद’ नाटक सुरू आहे. अनुपम बर्वे दिग्दर्शित ‘ठकीशी संवाद’मध्ये सुव्रत अभिनेत्री गिरिजा ओकसह पाहायला मिळत आहे. याशिवाय वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये सखी-सुव्रत दिसत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakhi gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song pps