अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तान व युएसए संघादरम्यान सामना झाला. या सामन्यात नवख्या युएसएने पाकिस्तानला हरवलं. या लाजिरवाण्या पराभवाबद्दल पाकिस्तानच्या संघावर टीका होत आहे, तर दुसरीकडे युएसए संघाचं कौतुक होत आहे.

गुरुवारी (६ जून रोजी) झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये युएसएच्या संघाने पाकिस्तानला धुळ चारली. या सामन्याचा हिरो मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हिरो ठरला. युएसएने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सौरभची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. सुपर ओव्हरमध्ये सौरभने एक बळी घेतला आणि युएसएने सामना जिंकला. यानंतर सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटू सौरभच्या गोलंदाजीचं कौतुक करत आहेत. अशातच मराठी संगीतकार व गायक यांनी सौरभचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

सौरभ या व्हिडीओत सलील कुलकर्णींच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘रे क्षणा थांब ना’ हे गाणं गाताना दिसतोय.
रे क्षणा थांब ना…
गाताना क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर.. ज्याने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला हरवण्यासाठी आणि यूएसए संघाला सामना जिंकून देण्यासाठी ती शानदार सुपर ओव्हर टाकली.
हा व्हिडीओ पाहून खूप भारी वाटतंय..

एक सॉफ्टवेअर इंजिनिअर..जो भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला आणि आता तो यूएस क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहे… हा प्रवास नक्कीच सोपा नसेल…( असं मी एका प्रोफेशनल क्रिकेटपटू मुलीचा बाबा म्हणून सांगू शकतो.)

( P.S – सौरभ… भावा..भारताबरोबर १२ तारखेला खेळताना just take it easy .. बाकी एरवी मग तुला full support आहेच..)

त्याने “एकदा काय झालं” च्या रिलीजपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला होता!! असं कॅप्शन सलील कुलकर्णींनी सौरभचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे.

सलील कुलकर्णींनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून सौरभ नेत्रावळकरचं कौतुक करत आहेत. अनेकांनी सौरभच्या या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. दरम्यान, सौरभला गायणाची खूप आवड आहे. त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यास त्यावर त्याने गायलेल्या अनेक मराठी गाण्यांचे व्हिडीओ आहेत.

‘तुला मानलं भाऊ’, पाकिस्तानला हरवणाऱ्या सौरभसाठी सुर्यकुमार यादवची खास पोस्ट

कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

यूएसए संघाच्या विजयाचा हिरो ठरलेला सौरभ नेत्रावळकर हा मुळचा मुंबईचा आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सौरभ आता अमेरिकेत राहतो. तो २०१० मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात भारताकडून खेळला होता. आता तो नवख्या यूएसए संघाकडून टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे.

Story img Loader