भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. लतादीदी आज असत्या तर त्या ९४वा जन्मदिवस साजरा करत असत्या. पण ६ फेब्रुवारी २०२२ला लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. फक्त देश नव्हे तर संपूर्ण जग त्यांच्या आवाज ऐकून मंत्रमुग्ध व्हायचं. भारतीय संगीत क्षेत्रात लतादीदींचं मोठं योगदान आहे. त्यांनी संपूर्ण करिअरमध्ये ३६ भाषांमध्ये जवळपास ५० हजारहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या समुधूर आवाजाने त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. आजही त्यांचा आवाज कानावर पडताच मंत्रमुग्ध व्हायला होतं.

अशा या स्वरकोकिला लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज संगीत क्षेत्रातील कलाकार मंडळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. लतादीदींबरोबरचे जुने फोटो शेअर करत त्यांच्याबद्दल लिहीतं आहेत. नुकतीच लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार सलील कुलकर्णी यांनी लतादीदींना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

Diwali celebrate in mumbai local video goes viral
मुंबईकरांचा नाद नाय! लोकलमध्ये साजरी केली जबरदस्त दिवाळी; प्रत्येक मुंबईकरानं पाहावा असा VIDEO
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Viral Video car pati
“जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही….”; कारवरील पाटीची का होतेय एवढी चर्चा, पाहा Viral Video
prithvik pratap wedding
पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्यावर भेटीला पोहोचला प्रथमेश परब! नवीन जोडप्यासह शेअर केला फोटो; म्हणाला, “मेरे भाई…”
maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap got married
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
Zeeshan Siddique Emotional Post
Zeeshan Siddique : “बाबा मला तुमची रोज आठवण…”; झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींबाबत भावूक पोस्ट
Sonali Kulkarni And Vidhu Vinod Chopra
“तू वेडी आहेस का?”, सोनाली कुलकर्णीने सांगितला विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “त्यावेळी मला…”
maharashtrachi hasyajatra fame gaurav more met anand shinde photo viral
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

सलील कुलकर्णी यांनी लतादीदींबरोबरचा जुना फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “आज आमच्या कुलदेवतेचा जन्मदिवस … तुम्ही आहातच इथे .. असणार आहात कायम…असाच संगीतातला योग्य मार्ग दाखवत राहा …”

हेही वाचा – Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत. सलील यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यंदाच्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान सलील यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला मिळाला आहे.