लोकप्रिय संगीतकार, गीतकार, गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत शेअर करत असतात. तसंच आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी मुलगी अनन्याच्या वाढदिवसानिमित्ताने सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सलील कुलकर्णींनी मुलगी अनन्याच्या बालपणींपासूनचे फोटो शेअर करत लिहिलं, “आमची अनन्या…आज अठरा वर्षांची झाली…आता मला पुन्हा हळूहळू लहान व्हायला हरकत नाही…आता दोन दोन आई आहेत मला…पण…इतक्या लवकर झालीस मोठी…अगदी अगदी आत्ता आत्ता पर्यंत तर शाळेत जातांना, एकदा मोज्याच्या आतला दोरा टोचतोय…एकदा ड्रेसचं लेबल टोचतंय…हे नीट करून दे.. तरच मी शाळेत जाईन म्हणणारी…आणि मी सगळं आवरून खाली जात नाही…तोपर्यंत दादाने पण जायचं नाही…असे रोज नवे नवे हट्ट करणारी माझ्या जीवाची सावली.”

Dhananjay munde
Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा – Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

पुढे सलील कुलकर्णींनी लिहिलं, “आता एकदम समजूतदार, शहाणी आणि जिथे फोकस करेल ते उत्तम करणारी अनन्या कधी झाली…कळलं सुद्धा नाही…कोणत्याही सहलीला अगदी आमच्या अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा एकदाही माझ्या कडेवरून न उतरलेली…कमीत कमी बोलून अख्ख्या कुटुंबाच्या हास्याचा रिमोट जिच्या हातात आहे…ती अनन्या…क्रिकेट मॅचेस ला एकटी जाऊन राहते, खेळते…कधी सिलेक्ट नाही झाली तर तिची तिची समजून घेते …एवढी मोठी झाली?”

“गाणं, वादन, उत्तम येत असूनही फक्त मोजक्या २-३ लोकांसमोर सादर करणारी…आणि माझं क्रीडापटू होण्याचं स्वप्न क्रिकेटर होऊन पूर्ण करणारी अनन्या…शुभंकरने त्याच्या कॉन्सर्टला काय कपडे घालावेत इथंपासून…सगळे निर्णय जिला विचारूनच घ्यावेसे वाटतात अशी आजीची सर्वात लाडकी नात…आपण सगळे एका दिवसात बोलतो तेवढं पंधरा दिवसांत बोलणारी मितभाषी कन्या हृदयनाथजींपासून सगळ्यांची लाडकी आहे…बस एक स्माईल ही काफी है , ” असं सलील यांनी लिहिलं.

हेही वाचा – ‘कलर्स मराठी’वरील मालिकांचा २३ डिसेंबरला रंगणार विशेष भाग; ‘अशोक मा.मा.’मध्ये येणार ट्विस्ट, तर ‘इंद्रायणी’ मालिकेत….

“अनन्या, प्रत्येक जन्मी मला तुझा बाबा होऊ दे…किंवा मग तुझा मुलगा तरी…पण तू आणि शुभू माझ्याबरोबरच होतात अनेक जन्म आणि असणारच…खूप खूप मोठी हो…तुझ्या प्रत्येक मॅचमध्ये तू बॉल टाकायला धावत येशील तेव्हा तुझा बाबा पण मनातून तुझ्यासाठी धावेल…कायम हसत राहा…खूप खूप आशीर्वाद…तुझा बाबा,” सलील कुलकर्णींच्या ही सुंदर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय गायिका आर्या आंबेकरने प्रतिक्रिया देत लिहिलं, “किती गोड लिहिलंय. अनन्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” तर एका नेटकरीने लिहिलं की, डोळ्यात पाणी उभं राहिलं. लेक नाही दिली देवाने माहिती नाही का? कदाचित खूप मी भावनिक आहे, सहन करू शकले नसते तीच परक्याकडे कायम स्वरुपी जाणे..तिच लग्न असेल त्याच्या मनात सूनेच्या रुपाने कायम वास्तव्य देणे, पण तरीही वाटत राहतं एक मुलगी हवी, अशीच आपलं बालपण ते ज्येष्ठपण सगळेच स्वतःच्या कुशीत घेणारी…खूप सुंदर व्यक्त झालास…बस, खूप शुभेच्छा बेटा…असा बाबा मिळायला भाग्य लागतं, बाबाला अशी लेक मिळायला पुण्य लागतं.

Story img Loader