लोकप्रिय गायक, संगीतकार सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतात. तसेच चालू घडामोडींवर परखड मत व्यक्त करतात. शिवाय मजेशीर गोष्टी देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी मुलासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलील कुलकर्णींचा मुलगा शुभंकर कुलकर्णी याचं पहिलं हिंदी गाणं श्रोत्यांच्या लवकरच भेटीस येणार आहे. त्यानिमित्ताने सलील यांनी शुभंकरचे बाबा म्हणून खास पोस्ट केली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराजचं शिक्षण माहितेय? जाणून घ्या…

शुभंकरबरोबर काही फोटो शेअर करत सलील कुलकर्णींनी लिहिलं आहे, “शुभूच्या बाबाची पोस्ट…ही पोस्ट संगीतकार सलील कुलकर्णीची नाही…शुभंकरच्या बाबाची आहे…आमच्या शुभूने अगदी २ वर्षांचा असताना ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ गायलं होतं…मग ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ या गाण्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं…मग त्याने अनेक गाणी गायली…’चिंटू’ चित्रपटापासून ते ‘एकदा काय झालं’ मधल्या ‘श्याम आणि राम’पर्यंत…”

“मग काही महत्वाचे पुरस्कार त्याला मिळाले…देशात परदेशात कार्यक्रम केले आणि तुम्ही त्याचं कौतुक सुद्धा केलं… थोरामोठ्यांनी पण केलं…अगदी मागच्या महिन्यात ध्वनिमुद्रित केलेल्या ‘श्रीरामस्तुती’साठी तुम्ही कौतुकाचा वर्षाव केला…आता एक तरुण गायक म्हणून त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय…स्वानंद किरकिरेने लिहिलं आहे…अप्रतिम शब्द आहेत आणि सलील कुलकर्णीचे संगीत आहे….’एक बात कहु?…तुम जाओ मत..रहो…’ तुमचा आशीर्वाद हवा आहे…(गाणं Spotify, Apple Music वगैरे सगळीकडे आजच येतं आहे, व्हिडीओ काही दिवसांत येईल.),” असं सलील यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – “यासाठी केला होता अट्टाहास…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, म्हणाला…

सलील कुलकर्णींच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शुभंकरला शुभेच्छा देताना चाहते दिसत आहेत.