लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे अनेक वर्षांपासून मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची बॉलीवूडमधल्या बऱ्याच कलाकारांशी चांगली मैत्री आहे. त्यापैकी एक म्हणजे सलमान खान. महेश मांजरेकर यांचं सलमान खानशी खूप चांगलं नातं आहे. सलमानच्या अनेक चित्रपटात महेश मांजरेकर झळकले आहेत. नुकताच महेश यांचा ‘जुनं फर्निचर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान एका भूमिकेत पाहायला मिळणार होता, याचा खुलासा महेश मांजरेकरांनी स्वतः केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपट २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ज्येष्ठांच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात स्वतः महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, गिरीश ओक असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, शरद पोंक्षे, ओंकार भोजने, मकरंद अनासपुरे असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात सलमान खान देखील पाहायला मिळणार होता. या चित्रपटातील एक भूमिका सलमानला प्रचंड आवडली होती, यासंदर्भात महेश मांजरेकरांनी ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीमध्ये खुलासा केला.

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीची कलर्सच्या नव्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत वर्णी, पोस्ट करत म्हणाली, “लवकरच…”

महेश मांजरेकर म्हणाले, “‘जुनं फर्निचर’ मधील उपेंद्र लिमयेच्या भूमिकेसाठी सलमान खानला विचारण्यात आलं होतं. त्याला हा चित्रपट प्रचंड आवडला होता. शिवाय ती भूमिकाही त्याला खूप आवडली होती. त्या भूमिकेसाठी सलमान हो देखील म्हणाला होता. पण…आता ईदला त्याला भेटायला गेल्यावर तो मला म्हणाला, “कधी चित्रपट दाखवतोय?” कारण त्याला खूप आवडलेला विषय आहे.”

हेही वाचा – ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो

दरम्यान, २०२१ मध्ये ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यामध्ये सलमानचा मेहुणा व अभिनेता आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत दिसला होता. तसंच २०१९ मध्ये महेश मांजरेकरांची कन्या सई हिनं सलमानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan was going to appear in the this role in the movie juna furniture pps