मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची जोडी कायम चर्चेत असते. क्रांती अनेक प्रकरणांमध्ये नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अन्य बॉलीवूड सेलिब्रिटींवर ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्यामुळे समीर वानखेडे आणि त्यांची टीम गेली दोन वर्षे चर्चेत आहे. या सगळ्या काळात त्यांना पत्नी क्रांती रेडकरने कशी साथ दिली याबद्दल समीर वानखेडेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “…म्हणून लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला आई होण्याचा निर्णय”, राधा सागरने सांगितले कारण; म्हणाली, “गरोदरपणात नवरा…”

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”

अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे या लोकप्रिय जोडीची पहिल्यांदाच अभिनेत्री अमृता राव आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांनी ‘कपल ऑफ थिंग्ज’मध्ये मुलाखत घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी क्रांतीचे कौतुक करत अनेक विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, “माझ्या घरी क्रांतीच्या रुपाने दुर्गा आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती माझ्या घरची दुर्गा आहे कारण, ती नेहमी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी असते. मी बाहेर लोकांना सांगतो, माझ्यावर तर गोष्टी नंतर येतील आधी माझ्या घरच्या दुर्गेशी लढा! मला माहिती आहे की, माझ्या या लढ्यात ती कायम माझ्याबरोबर आहे आणि यासाठी तिचे खरंच कौतुक आहे.”

हेही वाचा : “८० ते ८५ टक्के निकामी फुफ्फुसं, श्वसनाचा त्रास अन्…”, विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार; म्हणाले, “शरीराची किंमत…”

समीर वानखेडे पुढे म्हणाले, “लग्न झाल्यापासून आजवर क्रांतीने माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नाही. तिच्यासारखी जोडीदार प्रत्येकाला मिळावी…मला सातजन्म पत्नीच्या रुपात क्रांतीच मिळो. ती केव्हाच घाबरत नाही, माझ्या मुलींची खूप चांगली काळजी घेते. मला उद्या काही झाले तरीही माझ्या मुलींसाठी क्रांती नेहमीच आहे त्यामुळे मला खरंच काळजी नाही. ती स्वत: एक सक्षम स्त्री असल्याने आजच्या घडीला मला कोणत्याच गोष्टीचे भय, भीती नाही…मी निर्धास्त आहे.”

हेही वाचा : “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

दरम्यान, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी २०१७ मध्ये लग्न केले. आज या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती या दोघींचा चेहरा न दाखवता त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

Story img Loader