कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. याप्रकरणात वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खानचा मुलगा आर्यना खानला अटक केली होती. पण याप्रकरणी सध्या समीर वानखेडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अशातच त्यांनी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची बेधडक उत्तर दिली. तसेच वानखेडे यांनी त्यांना आवडणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचाही खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – काजोलच्या ‘या’ व्हिडीओची मराठमोळ्या अभिनेत्रीला पडली भूरळ; म्हणाली, “ती खूप…”

‘खुपते तिथे गुप्ते’च्या गेल्या भागात समीर वानखेडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी रॅपिड फायर हा खेळ खेळताना त्यांना आवडती मराठी अभिनेत्री कोण? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर समीर वानखडे यांनी पत्नी क्रांती रेडकरच्या नावाच्या ऐवजी भलतच नाव घेतलं.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतून आणखी एक एक्झिट; ‘या’ ज्येष्ठ कलाकाराच्या जागी दिसणार ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता

रॅपिड फायर खेळताना अवधुत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारलं की, ‘मराठी आवडती अभिनेत्री कोण? पर्याय देतच नाही. क्रांती सोडून कुठलंही नाव सांगा.’ यावर हसत समीर वानखेडे म्हणाले की, ‘तुम्ही आता मला मारूनचं टाकणार.’ त्यानंतर ते थोडा विचार करून म्हणाले की, ‘उर्मिला कानिटकर.’

हेही वाचा – “तुला स्टेजवर येऊन मारीन” असं उपेंद्र लिमये प्रवीण तरडेंना का म्हणाले होते? वाचा…

दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर व उर्मिला कानिटकर या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. क्रांतीच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिला ही असते. क्रांतीने २०१५ साली पहिल्यांदा दिग्दर्शित केलेल्या ‘काकण’ चित्रपटात उर्मिला प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता तिच्या दुसऱ्या येणाऱ्या ‘रेनबो’ चित्रपटातही उर्मिला झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede reveals his favourite marathi actress pps