मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंबरोबर लग्न केले. समीर आणि क्रांती यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये झाले आहे. १९९७ पासून दोघेही एकमेकांना ओळखत होते. दोघांनीही नुकत्याच दिलेल्या ‘कपल ऑफ थिंग्ज’च्या मुलाखतीत कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या वेळी समीर वानखेडेंनी पत्नी क्रांती रेडकरबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा : “२० वर्षे एकच मोबाइल फोन…”, पंकज त्रिपाठींनी वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा; म्हणाले, “मी व्हॉट्सॲप…”

Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Woman In Bengaluru Killed Body Chopped
श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?

समीर वानखेडे कॉलेजच्या जीवनातील आठवणी सांगत म्हणाले, “५३ मुलींच्या वर्गात आम्ही केवळ ४ मुलं होतो. या मुली प्रचंड दंगा करायच्या क्रांती शेवटच्या बाकावर, तर मी वर्गात पहिल्या बाकावर बसून अभ्यासात मग्न असायचो. क्रांतीला पहिल्यांदा कॉलेजचे जिने चढताना पाहिले तेव्हा माझ्या मनात ही नॉनसेन्स मुलगी कोण आहे? आम्हाला दोघांनाही एकमेकांचा प्रचंड राग यायचा.”

हेही वाचा : “प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट

समीर वानखेडे क्रांतीला नॉनसेन्स का बोलायचे? यामागील कारण सांगताना ते म्हणाले, “कॉलेजमध्ये हजेरी लावण्यासाठी वेगळी लिस्ट देतात त्यावर क्रांती माझ्या नावासमोर मुद्दाम मला त्रास देण्यासाठी सलमान खान किंवा दुसऱ्याच कोणाचे तरी नाव लिहून ठेवायची. मला माहिती होते की, ही तीच नॉनसेन्स मुलगी आहे.” यावर क्रांती म्हणाली, “यांच्यामध्ये प्रचंड रुबाब, एक वेगळीच वृत्ती होती ती मोडून काढण्यासाठी मी त्यांना प्रचंड त्रास द्यायचे.”

हेही वाचा : “दुबईहून येताना मला समीर वानखेडेंनी विमानतळावर अडवलं अन्…”, क्रांती रेडकरने सांगितला २०१० मध्ये घडलेला किस्सा

“मला त्रास देण्यासाठी क्रांती आणि तिची गुंडांची गॅंग शेवटच्या बाकावरुन दुसऱ्या बाकावर बसायल्या आल्या. मला सारखा मागून हात लावून मला पेन दे…असे सांगायची मी तिला थेट नाही म्हणायचो. अभ्यासाच्या बाबतीत तिला अजिबात गांभीर्य नव्हते. मी हे मान्य करतो की, मला खरंच तिचा खूप राग यायचा. त्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या पण, सुरुवातीला आम्हाला एकमेकांचा खूप राग यायचा.” असे समीर वानखेडे यांनी सांगितले.