अभिनेत्री क्रांती रेडकर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघेही एकमेकांना जवळपास १९९७ पासून ओळखत होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये होणारी भांडणं ते पुढे जाऊन झालेलं प्रेम हा संपूर्ण प्रवास दोघांनीही आरजे अनमोल आणि अभिनेत्री अमृता राव यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सांगितला. या वेळी समीर वानखेडेंनी क्रांतीवर असलेले प्रेम, तिच्या सवयी अशा अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.

हेही वाचा : कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या भूमी पेडणेकरची पहिली कमाई माहितीये का? ‘या’ ठिकाणी करत होती काम

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ

कॉलेज संपल्यावर क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही एकमेकांना २०१० मध्ये ९ वर्षांनी विमानतळावर भेटले. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले याच कालावधीत समीर वानखेडे यांच्या पहिल्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. पुढे जवळपास ५ वर्षांनी दोघांनीही मनातील भावना व्यक्त करून २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. आज या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती या दोघींचा चेहरा न दाखवता त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा : अलिबागमध्ये तयार होणार विराट-अनुष्काचं आलिशान फार्महाऊस, किंमत ऐकून व्हाल थक्क

बायको क्रांती रेडकरविषयी सांगताना समीर वानखेडे म्हणाले, “आज २६ वर्ष मी क्रांतीला ओळखतो. पुढच्या जन्मात सुद्धा मला तुझ्यासारखी बायको मिळू दे हे कायम मी तिला सांगत असतो. २०१० मध्ये तिने माझा पहिल्यांदा फोन नंबर घेतला होता. आज कितीही काम असले तरी मी तिचा फोन उचलण्याचा नेहमी प्रयत्न करतो.”

हेही वाचा : “…तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं”, चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा; म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारणे…”

“क्रांतीचा फोन आल्यावर आजही माझ्या मनात पूर्वीप्रमाणे उत्सुकता असते. मला आजही तिच्याशी फोनवर बोलायला प्रचंड आवडतं आणि मी तिचा फोन कधीच कट करत नाही… नेहमी वेळात वेळ काढून उचलतो.” असे समीर वानखेडे यांनी सांगितले.

Story img Loader