अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. क्रांती अनेक प्रसंगांमध्ये नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. या लोकप्रिय जोडीने अलीकडेच अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. या वेळी क्रांतीने पती समीर वानखेडे यांचा कायम अभिमान वाटत असल्याचेही सांगितलं.

हेही वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अपूर्वा नेमळेकर ‘या’ भूमिकेत झळकणार, नवा प्रोमो पाहिलात का?

What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”

क्रांती रेडकर म्हणाली, “माझ्या नवऱ्याचं काम मी खूप जवळून पाहिलं आहे. समीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मिळून जे काम केलंय ते खरंच खूप मोठं आहे. समीर यांचा रक्ताने माखलेला शर्ट मी स्वच्छ केलाय, त्यांच्या फाटलेल्या पॅन्ट्स मी फेकून दिल्या आहेत. बूटात राहिलेली माती मी साफ केली आहे. मला ते कोणत्या परिस्थितीत काय काम करतात याची पूर्णपणे कल्पना आहे. अनेकदा रात्री ते घरी येत नाहीत म्हणून काळजी वाटते. घराच्या बाजूने जाणार असतील, तर संपूर्ण टीमसाठी मी चहा आणि बिस्किट तरी घेऊन जाते. ड्रग्जविरोधात यांच्या टीमने जे काम केलंय ते खरंच खूप अभिमानास्पद आहे. आजही अनेक मुलांचे पालक यासाठी त्यांचे आभार मानतात. एवढंच नाहीतर आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला सुद्धा हे तीन तासच थांबले होते. महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना जावं लागलं, त्यामुळे सगळ्या नातेवाईंकांना मी एकटी भेटले आणि वरातीत सुद्धा एकटी होते.”

हेही वाचा : “बरं झालं आईबरोबर एकही सीन नव्हता…”, विराजस कुलकर्णीने सांगितला ‘सुभेदार’च्या शूटिंगचा अनुभव; म्हणाला, “अंगावर काटा…”

समीर वानखेडे याविषयी म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली मी कामावर जाताना झोपलेल्या असायच्या आणि मी जेव्हा परत यायचो तेव्हा सुद्धा त्या झोपलेल्या असायच्या. त्यांना पुरेसा वेळ केव्हाच देता आला नाही. अनेकदा क्रांती सुद्धा झोपलेली असायची त्यामुळे माझ्या कुटुंबियांशी मी फक्त फोनवर बोलायचो. त्या व्यतिरिक्त आमचं बोलणं नाही व्हायचं.”

हेही वाचा : आजोबा अरुण कदमांचा नातवाबरोबरचा पहिला फोटो समोर, त्यांची मुलगी पोस्ट शेअर करत म्हणाली…

“कामावर रुजू होऊन मला आता १८ वर्ष पूर्ण झाली पण, आजपर्यंत एकदाही क्रांतीने कधीच तू आम्हाला वेळ देत नाहीस अशी तक्रार केली नाही. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घरातील अन्य कार्यक्रम विसरलास अशी तक्रार तिने केव्हाच केली नाही.” असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

Story img Loader