छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदवीरांना नवीन ओळख मिळाली आणि ते अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले. याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले ( Samir Choughule ) यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. लवकरच समीर चौघुले यांचा ‘गुलकंद’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ते सई ताम्हणकरबरोबर पाहायला मिळणार आहेत. याच चित्रपटात सईबरोबरचं गाणं पाहून समीर चौघुलेंच्या वडिलांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली. ती काय होती? जाणून घ्या…
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले ( Samir Choughule ) व्यतिरिक्त प्रसाद ओक, ईशा डे महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. आतापर्यंत या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. ‘चंचल’ आणि ‘चल जाऊ डेटवर’ ही ‘गुलकंद’ चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. ‘चल जाऊ डेटवर’ या गाण्यात सई व समीर चौघुलेंचा डान्स पाहायला मिळत आहे. हेच संपूर्ण गाणं पाहिल्यानंतर समीर चौघुलेंचे वडील आश्चर्य चकीत झाले.
‘मराठी मनोरंजन वाहिनी’ या युट्यूब चॅनेशी संवाद साधताना समीर चौघुलेंनी ( Samir Choughule ) ‘चल जाऊ डेटवर’ गाण्याबद्दल सांगितलं. तेव्हा ईशा डेने हे गाणं पाहून समीर चौघुलेंच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा केला. ईशा म्हणाली, “समीर दादाच्या बाबांनी गाणं संपूर्ण पाहिल्यानंतर म्हणाले होते, हा तू आहेस?”
सई ताम्हणकर आणि सई चौघुलेचं ( Samir Choughule ) ‘चल जाऊ डेटवर’ गाणं अविनाश-विश्वजीतने संगीतबद्ध केलं आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतने हे गाणं आपल्या दमदार आवाजात गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून युट्यूबवर १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, ‘गुलकंद’ चित्रपटात वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे देखील पाहायला मिळणार आहेत.