दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकतंच सना शिंदेने या चित्रपटाबद्दल केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सना शिंदे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सना ही तिच्या पणजीबरोबर फोटो काढताना दिसत आहे. त्यावेळी अंकुश चौधरी आणि केदार शिंदेही तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

सना शिंदेची पोस्ट

काल माझी पणजी म्हणजेच माझ्या ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला. मी तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यास फार उत्सुक होते. हा पूर्णपणे माझ्या नकळत काढलेला फोटो आहे. यावेळी माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि अंकुश चौधरी कायमस्वरुपी हा क्षण लक्षात राहावा म्हणून काढत असलेला फोटो.

तिने मला भानुमतीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा होता. असच अजून शिकत राहीन, प्रामाणिकपणे काम करत राहीन.॥ श्री स्वामी समर्थ ॥, असे सना शिंदेने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.