केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याचबरोबर या चित्रपटातील ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची मुलगी मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पीयूष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका लोकप्रिय मराठी स्टार कपलच्या लेकीची झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : Baipan Bhari Deva trailer: मंगळागौरीचा खेळ, पुरुषी अहंकार अन् त्याला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट; ‘बाईपण भारी देवा’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणारी ही स्टारकिड म्हणजे सुकन्या मोने व संजय मोने यांची मुलगी ज्युलिया. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते त्यांच्या बहिणींबरोबरचा एक जुना फोटो पाहताना दिसतात. या ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटोमध्ये ज्युलिया सर्वात मागे उभे असलेली दिसत आहे. ज्युलिया सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये फक्त ती फोटोपुरतीच दिसणार, की या चित्रपटामध्ये कामही करताना दिसणार हे अजून गुलदस्त्यात आहे आणि हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होईल