‘फ्रेशर्स’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख ही नेहमी चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेता प्रसाद जवादेबरोबर गुपचूप सारखपुडा उरकल्यानंतर आता तिच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अमृताच दुसऱ्याबाजूला ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू आहेत. हेच नाटक पाहून अभिनेते संजय मोने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा किस्सा तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – क्रांती रेडकरने शेअर केला लेकींच्या गरबा डान्सचा व्हिडीओ, म्हणाली…

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री; झळकला महत्त्वाच्या भूमिकेत

‘मीडिया टॉक मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने संजय मोने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “काही दिवसांपूर्वी संजय मोने आमचं नाटक ‘नियम व अटी लागू’ बघायला आले होते. नाटक पाहून झाल्यानंतर ते मला म्हणाले की, खूप दिवसांनंतर मला मुक्ता बर्वेसारखा रंगमंचावर वावर झाल्यासारखं वाटलं. मी हे ऐकताच खूप भारावून गेले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेतून मी खूप प्रेरित झाले. पण मी अजिबात मुक्ता बर्वे हिच्याशी तुलना करू शकत नाही.”

हेही वाचा – Video: “देशात दोन गोष्टी विकल्या जातात सेक्स आणि…”, राज कुंद्राचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, ‘नियम व अटी लागू’ या नाटकात अमृता व्यतिरिक्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाचे लेखन संकर्षणनेच केलं असून दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. नुकताच या नाटकाचा यूएस दौरा झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay mone compared amruta deshmukh performance with mukta barve pps