मराठी कलाविश्वात हरहुन्नरी कलावंताची कमी नाही, यातीलच एक नाव म्हणजे अभिनेते संजय मोने. खुमासदार लेखणीने जितके ते प्रसिद्ध, तितकेच अभिनेते म्हणून देखील श्रेष्ठ आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा माध्यमांमधून ते कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. किस्से सांगणे यात त्यांचा हातखंडा आहे. यासाठी ते कलाविश्वात प्रसिद्ध देखील आहेत. नुकतच संजय मोने यांनी त्यांच्या ३६ वर्षाच्या करिअरबाबत मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा- “मला ‘हे’ दुःख गेले चार-पाच दिवस सतावतंय…” क्रांती रेडकरचा नवा व्हिडीओ चर्चेत

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Sanjay Raut
Sanjay Raut : “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक, आरोपींना वाचवण्यासाठी…”; संजय राऊत यांचा आरोप
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून, त्यांना..”; बीड प्रकरणावरुन संजय राऊत यांचा आरोप काय?
What Jitendra Awhad Said About Walmik Karad?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य, “वाल्मिक कराड ताब्यात आला पण आका अजूनही…”

काही दिवसांपूर्वी बाईपण भारी देवाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बाईपण भारी देवा चित्रपटात संजय मोने यांची पत्नी अभिनेत्री सुकन्या मोने आणि त्यांची मुलगी ज्युलियाने भूमिका साकारली आहे. या पार्टीत संजय मोने यांनी त्यांच्या करिअरबद्दल खुलासा केला आहे. संजय मोने म्हणाले, मी लिहीतो त्यामुळे लोकांना वाटतं मी अभिनेता बरा आहे. आणि माझं लिखान बघून लोकांना वाटतं मी लेखक बरा आहे आणि या संशयास्पद वातावरणामध्ये गेली ३६ वर्ष आहे. संजय मोनेंच्या या मिश्किल विधानानंतर सगळीकडे एकच हश्या पिकला.

हेही वाचा- “खूप खूप श्रीमंत झालेय मी…”, सुकन्या मोनेंच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाल्या “मोठा पुरस्कार…”

संजय मोने यांनी आजवर ‘टाइम बरा वाईट’, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ ‘क्लासमेट्स’, ‘अ रेनी डे’, ‘मातीच्या चुली’, ‘रिंगा रिंगा’ आणि ‘भो भो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्यांना एक उत्तम लेखक म्हणूनही ओळखले जाते. ‘सत्य सावित्री आणि सत्यवा, ‘संशय कल्लोळ’, ‘साडे माडे तीन’, ‘इट्स ब्रेकिंग न्युज’, ‘पक पक पकाक’ या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Story img Loader