मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती अभिनेते संजय मोने यांनी सुकन्या मोनेंबाबत एक खुलासा केला आहे.

हेही वाचा- “कधी निर्भया, कधी मुंबई, आणि आता मणिपूर…”, प्रसिद्ध गायकाने मणिपूर घटनेवर व्यक्त केला संताप

‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. या सक्सेस पार्टीत संजय मोने पत्नी सुकन्या मोनें यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. संजय मोने म्हणाले, “मी सगळ्यात पहिल्यांदा चित्रपटाचे निर्माते आणि सगळ्यांचे आभार मानतो. कारण चित्रपटाच्या शुटींग आणि प्रमोशनमुळे सुकन्या नेहमी घराबाहेर असायची आणि त्यामुळे मला घरात एकटं राहता आलं.” मोनेंच्या या वाक्यानंतर सगळीकडे एकच हसा पिकला.

हेही वाचा- “आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही…”, मणिपूर घटनेवर संतापली अभिज्ञा भावे; म्हणाली…

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्त्रीयांवर आधारीत या चित्रपटाचे पुरुष वर्गातूनही कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Story img Loader