सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण असून, सर्वत्र नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. अनेक कलाकारही उमेदवारांचा प्रचार करीत आहेत; तर काही कलाकार सोशल मीडियावरून उमेदवारांसाठी पोस्ट लिहीत आहेत. नुकतंच नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या कलाकारांना एक सल्ला दिला आहे.

अभिनेते संजय मोने मुंबईच्या दादर – माहीम भागात राहतात. याच भागातून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’कडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून, त्यांना आपलं मत का द्यावं याचे १० मुद्दे संजय मोने यांनी फेसबुक पोस्टमध्ये मांडले आहेत. पण, अमित ठाकरे यांना मत का देऊ नये हे सांगणारा त्यांनी एकमेव मुद्दा मांडला आहे. संजय मोने यांनी या पोस्टची सुरुवात उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या कलाकांराना सल्ला देत केली आहे. संजय मोने या पोस्टमध्ये काय म्हणाले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

shivsena leader sanjay raut
पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढलं पाहिजे – संजय राऊत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

हेही वाचा…“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…

“माझी सर्व कलाकारांना विनंती आहे,
तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील. आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा; तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका. आपला आत्मसन्मान विकू नका. कारण- निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही. (हिंग लावून विचारणं ही एक म्हण झाली. प्रत्यक्षात हिंग महाग असतो) तेेव्हा या वेळी पक्ष नाही, तर व्यक्तीला मतदान करा.
आता माझ्या माहीम मतदारसंघाबद्दल.इथे बरेच उमेदवार आहेत. त्यातले बरेच जण विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही.
माझ्या मतदारसंघात श्री. अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं? याची कारणं मला सांगावीशी वाटतात.
१) ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडित आहेत.
२) त्यांचा या मतदारसंघाशी जन्मापासून संबंध आहे.
३) ते तरुण आहेत. त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न किंवा ज्या काही समस्या आहेत, त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.
४) निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेव्हा समोर आलेला प्रश्न मराठी, हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे) किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषांत आला, तर त्याचा निदान अर्थ समजण्याइतकी त्यांची कुवत आहे.
५) त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा. श्री. स्वरराज ठाकरे) त्यांना पूर्णपणे अवगत आहेत
६) आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याआधी कुठेही त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत भीती वा धाकदपटशा, अशी भावना नाही.
७) वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.
८) एक कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते की, त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.
९) त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.
१०) शिवाजी पार्कला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल, तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती, जिथे या वर्षी काही हजार तरुण-तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते. आणि लोक पार ११-१२ वाजेपर्यंत निर्धास्तपणे वावरत होते.
आता श्री. अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना; पण तरीही शोधला-
१) श्री. अमित ठाकरे अनुभवी नाहीत; पण ‘तो’ आपणच त्यांना निवडून दिलं, तर सहज मिळू शकेल.”

हेही वाचा…“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…

संजय मोने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

संजय मोने यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करीत म्हटले, “एक संधी मनसेला द्यायलाच हवी. “दुसऱ्या एका युजरने लिहिले, “अगदी सहमत. उमेदवार असाच हवा. लोकांसाठी काही करण्याची इच्छा असलेला. मनसेसाठी आपण, परचुरे व तेजस्विनी पंडित वगळता कुणीही बोलल्याचं दिसत नाही. मराठी सिनेमाचे जेव्हा काही प्रश्न असतात, प्राईम टाईम असो किंवा मल्टिप्लेक्सवाले शोज जास्त देत नाहीत हा मुद्दा असो किंवा इतर काही, तेव्हा हे लोक पळत राजसाहेबांकडे येतात; पण आत्ता काही प्रचार करताना दिसत नाहीत. कितीतरी कलाकारांना राज ठाकरेंनी सपोर्ट दिलेला आहे. आणि तेही कुठल्याही अपेक्षेशिवाय.” तर आणखी एका युजरने लिहिले, मोने, कलाकार पोटार्थी आहेत… पैसे मिळाले, तर अभिनय जरूर करावा …व्यवसाय आहे”.

Story img Loader