खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटावरून टोला लगावला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, नंतर कळालं की तो चित्रपट एकनाथ शिंदेवरच होता, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर सिनेमा बनवला जाऊ शकतो तर. मुख्य म्हणजे हा सिनेमा आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित नव्हता हे नंतर कळालं, हा चित्रपट तर एकनाथ शिंदेवरच होता,” असं म्हणत राऊतांनी टोला लगावला. ‘धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे, याबद्दल संजय राऊतांनी भाष्य केलं. “धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे यांचं निधन झाल्याचं दाखवलंय, मग दुसऱ्या भागात काय दाखवणार? आता दुसऱ्या भागात नवीन धर्मवीर कोण ते पाहायला मिळेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं.
‘ठाकरे २’ चित्रपटाबाबत संजय राऊत यांचा खुलासा, म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो तर…”
दरम्यान, “‘ठाकरे २’ही चित्रपट येईल. जर एकनाथ शिंदे यांच्यावर चित्रपट येऊ शकतो तर…कारण ‘धर्मवीर’ हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नसून एकनाथ शिंदे यांचाच चित्रपट होता. हे नंतर कळलं.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.