मराठीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नावही आवर्जुन घेतलं जातं. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच तो करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आताही त्याने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

सध्या तो ‘नियम व अटी’ लागू या नाटकाच्या प्रयोगासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. परदेशवारीचे बरेच फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. याचदरम्यान त्याने शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरतोय. कारण शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याचं दिसत आहे. हाताला दुखापत झाली असल्याचं फोटो शेअर करत त्याने लिहिलेल्या कॅप्शननेही लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – “एकदा वेळ निघून गेली की…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लोकांना असं वाटतं…”

संकर्षण म्हणाला, “परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले. त्यात माझा १ (एक) हात जखमी झाला. याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती. म्हणून हा फोटो पोस्ट करत आहे”. संकर्षणची पोस्ट पाहता तो त्याच्या आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन करत असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टचा त्याच्या कोणत्या चित्रपटाशी किंवा नाटकाशी संबंध आहे हे समोर आलेलं नाही. पण त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक क्षण घाबरायला झालं, काळजी घे अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. तर, अभिनेत्री स्पृहा वरदने “मस्त रे” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे संकर्षणची ही पोस्ट प्रमोशनल असल्याचं चित्र दिसत आहे.

Story img Loader