नाटक, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याला मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण अमेरिका दौऱ्यावर गेला आहे. दल्लास येथील नाटकाचा प्रयोग संपल्यावर अभिनेत्याला एक खास व्यक्ती भेटायला आली होती. हा अनुभव संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “माय मॅन…”, प्रथमेशच्या वाढदिवसासाठी मुग्धाची खास पोस्ट, गोव्यातून शेअर केला रोमॅंटिक फोटो

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

“माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…” Please वाचा…

आज अमेरिकेतला डॅल्लस चा प्रयोग जोरदार झाला.. प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर”
ह्या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी २०११ साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता.. योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”…आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” इतकं भरून आलं मला.. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच..

आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय… “खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली, अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक
“आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या निमित्ताने भेट झाली … THANK YOU THANK YOU

आणि हो; आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय .. महाराष्ट्रात.. “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा ..

हेही वाचा : “माझ्या मुलीने किसिंग सीन दिला तर…”, रवीना टंडनने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “जर ती…”

संकर्षणने हा अनुभव त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे. गेली अनेक वर्ष अभिनेता ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. या कार्यक्रमामुळे संकर्षण घराघरांत लोकप्रिय झाला. उत्तम वक्तृत्व शैली, सहकार्याची भावना आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याने घरोघरी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान, या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘नियम व अटी लागू’ या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader