मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. संस्कृतीचे लाखो चाहते आहेत; पण ती एका अभिनेत्याची चाहती आहे आणि आता तिला त्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधीदेखील मिळाली आहे. नुकतीच तिनं ‘मिरची मराठी’च्या यूट्यूब चॅनेलला भेट दिली. या मुलाखतीदरम्यान तिनं या अभिनेत्याबाबत खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिरची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा संस्कृतीला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा संस्कृती म्हणाली, “खऱ्या गोष्टीवर आधारित अशी एक स्पेशल फिल्म पाइपलाइनमध्ये आहे. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण- वेगळा अनुभव मिळालाय मला या चित्रपटातून. चित्रपटाचं शूटिंग झालंय आणि आता त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. त्याच्याविषयी थोडंसं मीडियामध्येही आलं होतं. कदाचित माझ्यासाठी हा चित्रपट माझं आयुष्य बदलणारा असेल.”

हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…

संस्कृती पुढे म्हणाली, “अजून एक चित्रपट येतोय आणि मी त्यासाठी खूप उत्साहित आहे. अशा पद्धतीचा चित्रपट मराठीत खूप दिवसांनंतर येतोय. आपण आता हल्लीचे जे चित्रपट बघतो ना त्यापेक्षा हा वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही खूप मस्त आहे. या चित्रपटात माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे; ज्याची मी फॅन आहे. आम्ही नंतर मित्र झालो; पण मी अजूनही त्याला सांगत असते की, मी पहिली तुझी फॅन आहे आणि नंतर मैत्रीण आहे. तो मित्र म्हणजे सिद्धार्थ मेनन. त्याच्याबरोबर मी या चित्रपटात काम करतेय.”

हेही वाचा… संस्कृती बालगुडेने चित्रपटगृहात मोठ्या आवाजात राष्ट्रगीत गायलं; अभिनेत्री म्हणाली, “मला अशा लोकांविषयी शून्य आदर…”

“आम्ही याआधी ‘जून’ चित्रपटामध्ये एकत्र काम केलंय; पण ते असं समोरासमोर नाही. माझा सीन दुसरीकडे होता. जेव्हा ‘जून’ प्रदर्शित झाला, तेव्हा आमची मैत्री झाली. आमचं खूप गोष्टींमध्ये पटतं. मी त्याला ‘मॅजिक’ म्हणते आणि तो मला ‘गोल्डन गर्ल’ म्हणतो. मी त्याला आधी म्हणायचे की, आपल्याला ना एकत्र असं भारी काम मिळायला पाहिजे; जिथे आपले असे एकत्र सीन असतील आणि ते शेवटी झालंय,” असंही संसकृती म्हणाली.

हेही वाचा… दिवसातून ३० गोळ्या अन् इंजेक्शन्स…, मौनी रॉय ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त; म्हणाली, “मी ३ महिने अंथरुणाला खिळून…”

दरम्यान, संस्कृतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, संस्कृतीचा ‘८ दोन ७५’ चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित झाला. ‘घे डबल’ चित्रपटातदेखील संस्कृती झळकणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanskruti balgude is a fan of this famous actor will work together in a film dvr