संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याच्याकडे हिंदी माध्यमांमध्ये काम करायचा अनुभव आहे. संतोषने ‘मुंबई मेरी जान’, ‘भोसले’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्ज’ या चित्रपटामध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली होती. पुढच्या महिन्यामध्ये त्याचा ‘३६ गुण’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘कुत्ते’ या मल्टिस्टारर चित्रपटामध्ये संतोषची वर्णी लागली आहे. या चित्रपटामध्ये तब्बू, कोकणा सेन शर्मा यांच्यासारखे कलाकार काम करणार आहेत. संतोषने दिलेल्या या संधीबद्दल विशाल यांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, “मी मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या १८-१९ वर्षांपासून कार्यरत आहे. स्ट्रगल करत माझ्या कारकीर्दीची सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर मी आजही स्ट्रगल करतोय. इतका अनुभव असून सुद्धा मी चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला जातो. फक्त आता मला विशिष्ट पात्र साकारण्यासाठी ऑडिशन द्यावी लागते.”

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

आणखी वाचा – अभिनेता प्रथमेश परब भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…”

तो पुढे म्हणाला, “स्व. इरफान खान आणि दीपिका पदुकोन यांच्यासह विशाल सर ‘राणी’ नावाचा चित्रपट बनवणार होते. एका भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. पण इरफान यांच्या निधनाने तो प्रजेक्ट थांबला. आता ‘कुत्ते’च्या वेळी मला कास्टिंग कंपनीकडून फोन आला आणि त्यांनी विशाल सरांच्या या चित्रपटाबद्दल माहिती दिली. मला या चित्रपटामध्ये कास्ट केले आहे आणि माझ्या तारखाशी संबंधित चर्चा करण्यासाठी फोन केला आहे असे सांगितले. मी ऑडिशनबद्दल विचारणा केली. त्यावर समोरुन विशाल भारद्वाज यांनी तुम्हाला निवडले आहे असे म्हटले. राणीच्या वेळी दिलेल्या ऑडिशनवरुन त्यांनी मला ‘कुत्ते’साठी ऑफर दिले असल्याचे मला कळले.”

आणखी वाचा – अभिनेते मनोज जोशी ‘एअर इंडिया’वर संतापले; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला राग, नेमकं घडलं काय?

‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ या नाटकाद्वारे संतोषची कारकीर्द सुरु झाली. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. तो एक थी बेगम या वेब सीरिजमध्येही झळकला आहे.

Story img Loader