मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संतोष जुवेकर. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने संतोष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटात संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘छावा’नंतर संतोषची वर्णी अनुराग कश्यपच्या आगामी प्रोजेक्टमध्ये लागली आहे. याच निमित्ताने संतोषने नुकतीच सोशल मीडियावर अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने अनुराग कश्यपबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “हा एक माथेफिरू दिग्दर्शक आहे. वेड्यासारखं काम करत राहायचं या माणसाच व्यसन आहे आणि या वेड्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं वेड, स्वप्न माझं फार आधीपासून होतं. इतकं मनापासून पाहिलेलं स्वप्नं अखेर पूर्ण झालंच. मुझे AK (अनुराग कश्यप) बाबा का बुलावा आ ही गया.”

हेही वाचा – Video: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचा लेकीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

पुढे संतोषने लिहिलं आहे, “आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या शैलीत काम करण्याचा अनुभवही मी कमावलाय. अनुराग सरांबरोबर काम करण्याआधी त्यांची कामाची स्टाइल व कामाच्या पद्धती बद्दल ऐकून होतो. पण गेले काही दिवस त्यांच्याबरोबर काम करताना ह्याची देही ह्याची डोळा अनुभव घेतोय. माझ्यासाठी या सिनेमात काम करणं म्हणजे एक कार्यशाळा आहे.”

आभार मानत अभिनेत्याने लिहिलं की, अनुराग सर तुम्ही मला संधी दिल्याबद्दल खूप प्रेम. तुमच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न पूर्ण करून पुन्हा तुमच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आहे. खूप आदर आणि प्रेम सरजी (एके पापा) सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.

हेही वाचा – Video: “नाच्या, बायल्या, छक्का म्हणायचे”, अभिनेत्याने सांगितला कथ्थक शिकतानाचा अनुभव, म्हणाला, “२० वर्षापूर्वी…”

हेही वाचा – निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

दरम्यान, संतोष जुवेकरच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप मोठा हो संत्या भाऊ. आम्हाला अभिमान आहे”, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता संतोष भाऊ बॉलीवूड गाजवणार”. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक.”

Story img Loader