मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. झेंडा, मोरया यांसारख्या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली. संतोष सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोषने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटातील गाण्यावर त्याने हा व्हिडीओ बनवला आहे. या पोस्टमधून त्याने मराठी चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. “भावा all the very best..तुझं वेड…आणखीन वेड लावणार महाराष्ट्राला. माझ्या मायबाप प्रेक्षकांना माझ्या मराठी सिनेमाचं वेड लागूदेरे महाराजा गणपती बाप्पा मोरया. ३० डिसेंबरला वेड लागणार सगळ्या चित्रपटगृहात”, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; लेकीला निरोप देताना आईला अश्रू अनावर

हेही वाचा>> रितेश-जिनिलियाच्या गाण्याने काजोललाही लावलं ‘वेड’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “निस्वार्थ प्रेमापेक्षा…”

संतोषचा ‘३६ गुण’ चित्रपट गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. संतोष अनेकदा मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद व स्क्रिनबाबत तो अनेकदा भाष्य करतो. आताही त्याने रितेश देशमुखच्या वेड चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना विनंती केली आहे.

हेही वाचा>>१०० कोटींचा बंगला, ८० कोटींचं फार्म हाऊस अन्…; सलमान खानची एकूण संपत्ती माहिती आहे का?

रितेश देशमुख व जिनिलीया मुख्य भूमिकेत असलेला ‘वेड’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.