मालिका असो किंवा चित्रपट संतोष जुवेकरने दोन्ही माध्यमांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढेच नव्हे तर तो आता लवकरच बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. संतोष सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
संतोष शूटिंगला निघालेला असताना प्रवासदरम्यान त्याने एका सलूनवर स्वत:चा फोटो लावलेला पाहिला. हा फोटो पाहून अभिनेता भारावून गेला. याच निमित्ताने त्याने एक बालपणीची आठवण सर्वांबरोबर शेअर केली आहे.
हेही वाचा : Video : गर्जा महाराष्ट्र माझा! नऊवारी साडी नेसून सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
संतोष म्हणाला, “लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे तेव्हा केस कापणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे. “बाळा बोल कुणासारखे कापू केस तुझे…. अमिताभ बच्चन, मिथुन अनिल कपूर, शाहरुख खानसारखे की, सलमान खानसारखे….आणि मग त्यातला मी एक फोटो मी निवडायचो आणि सांगायचे. पण, ते कापायचे तसेच जसे बाबा त्यांना सांगायचे. (दोघं मिळून ह्या लहान जीवाला चु……. बनवायचे ) असो ते महत्त्वाचं नाही.”
“तर, सांगायचं कारण हे की, काल शूटला जाताना अचानक मला रस्त्यात एक केश कर्तनालय (सलून, hair dresser’s ) दुकान दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्डवर चक्क माझा फोटो लावला होता त्या भावानं…आता बहुतेक मुलं दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते…ये बाप्पू अपून तो हिरो बनगया! बोला तो बोला…जय महाराष्ट्र!” असं संतोषने सांगितलं.
हेही वाचा : महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक
दरम्यान, संतोषच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्याने ‘मोरया’, ‘झेंडा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो लवकरच ‘छावा’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.