मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संतोष जुवेकर मोरया, झेंडा या चित्रपटांतून घराघरात पोहोचला. संतोषचा ‘३६ गुण’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ‘३६ गुण’ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. या चित्रपटात संतोषने मुख्य भूमिका साकारली असून अभिनेत्री पूर्वा पवार प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे.

ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं असा विचार मांडणारा ‘३६ गुण’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात संतोष जुवेकरने नायिकेबरोबर किसिंग सीन दिले आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटातील या बोल्ड दृश्यांची झलक दिसली होती. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीचा संतोष जुवेकरचा हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटातील त्याच्या बोल्ड सीनची प्रचंड चर्चा होत आहे. संतोषने ‘३६ गुण’मधील त्याच्या बोल्ड सीनबद्दल नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

हेही वाचा >> “पत्नीचा फोन उचलला नाही तर…” जया बच्चन यांच्या रागीट स्वभावाबद्दल अमिताभ बच्चन यांचा खुलासा

हेही पाहा >> Photos : शोएब मलिक ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला करतोय डेट? सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो व्हायरल

संतोषने रेडिओ मिरचीला मुलाखत दिली. यामध्ये त्याला चित्रपटातील बोल्ड दृश्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “नवख्या कलाकारांना चित्रपटातील बोल्ड सीन करण्याबाबत काय सल्ल द्याल”, असा प्रश्न संतोषला विचारला गेला. यावर उत्तर देताना संतोष म्हणाला “मुळात चित्रपटातील बोल्ड सीन ही कथेची गरज असली पाहिजे. बोल्ड सीन करताना काही जाणवतं का, असा प्रश्न मला एकाने विचारला होता. चित्रपटातील किसींग सीन, बोल्ड दृश्य याकडे मी कामाचा भाग म्हणून पाहतो आणि सगळ्यांनी याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे”.  

हेही वाचा >> “मला या मुलाबरोबर…”, श्रेयस तळपदेने सांगितला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा किस्सा

संतोष पुढे सल्ला देत म्हणाला “दिग्दर्शकाने कट म्हटलं की लगेच थांबलं पाहिजे. दिग्दर्शकाने चार-पाच वेळा कट म्हटल्यानंतरही सीन चालूच आहे, असं होता कामा नये”.