मराठीसह हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक मराठमोळे समीर विद्वांस यांनी साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे समीर विद्वांस यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर समीर विद्वांस यांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. व्हॅलेंटाइन्स डेला समीर यांनी जुईली सोनलकरशी साखरपुडा केला आहे. हेमंतने शेअर केलेल्या फोटोत समीर व जुईली खूपच सुंदर दिसत आहेत. दोघांनी या खास दिवसासाठी ऑफ व्हाइट रंगाचे कपडे निवडले होते.
प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos
समीर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी साखरपुडा केल्याचं म्हटलंय.
त्यांच्या या फोटोवर कियारा अडवाणीने कमेंटमध्ये शुभेच्छा देत ब्लॅक हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय श्रेया बुगडे, मयुरी देशमुख, अनघा अतुल, जयवंत वाडकर, आशय कुलकर्णी, सुयश टिळक यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. समीर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आनंदी गोपाल’, ‘डबल सीट’, ‘धुरळा’, ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.