समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा हा संपूर्ण जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमाचं नवीन पोस्ट नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : श्वेता शिंदेने भर रस्त्यात केलं महिलेचं बाळंतपण, ‘त्या’ थरारक प्रसंगाविषयी म्हणाली, “माझ्या ओढणीमध्ये…”

सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते. याचं औचित्य साधून म्हणजेच पुढच्या वर्षी ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ हा बहुचर्चित चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यावर प्रमुख भूमिका कोण साकारणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.

हेही वाचा : शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज; कोणतं? घ्या जाणून

चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत. महात्मा फुलेंसारख्या दिसणाऱ्या संदीप कुलकर्णींच्या हुबेहूब लूकची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडेंसह या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

हेही वाचा : आठ महिन्यांची गरोदर असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू

‘सत्यशोधक’ चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केलं आहे. १९व्या शतकाची सुरूवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भव्य सेट उभारण्यात आले होते. या चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. दरम्यान, हा बहुचर्चित चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyashodhak movie release date announced by makers this actor will play mahatma jyotirao phule role sva 00