शंभराव्या अखिल भारतील मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा नुकताच पिंपरी-चिंचवड येथे पार पडला. या सोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर सुद्धा या नाट्यसंमेलनाला उपस्थित होत्या. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी नियोजनस्थळी कलाकारांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. लेट्सअप मराठीला प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने आपली खंत बोलून दाखवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविता मालपेकर म्हणाल्या, “शंभराव नाट्यसंमेलन ही रसिकांसाठी पर्वणी आहे, पण आम्हा कलाकारांसाठी नाही. इथे सगळाच सावळा गोंधळ सुरू असून गैरसोय आहे. कोणतीही सोय नाही, जेवायला जायला गाड्या नाहीत. मोहन जोशी, सुरेश खरे अशा वयस्कर ज्येष्ठ कलाकारांना अर्धा ते पाऊणतास बाहेर थांबवावं लागलं. संमेलनाच्या माजी अध्यक्षांना जेवताना बसायला जागा नव्हती अशाप्रकारचं हे संमेलन होतं.”

हेही वाचा : किरण मानेंची राजकारणात एन्ट्री! हाती शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…”

सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, “दरवर्षी अनेक कलाकार संमेलनाला येतात, भाषणं ऐकतात थोडावेळ बसले की, त्यानंतर उठून आपआपल्या कामाला जातात…कोणीही पूर्णवेळ थांबत नाही. फार थोडे कलाकार शेवटपर्यंत असतात याची मला खरंच खंत वाटते. एखाद्या आयोजकाने पूर्ण तयारी केली असेल, तर कलाकारांनी देखील वेळ देऊन थांबणं गरजेचं आहे.”

हेही वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी करते ‘हे’ काम, लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल

“आयोजक असो किंवा कलाकार या सगळ्या गोष्टींची काळजी नाट्यसंमेलनाच्या काळात घेतली गेली पाहिजे. जर दोन दिवस संमेलन असेल, तर त्या दोन दिवसांत निर्मात्यांनी प्रयोग ठेऊ नयेत. कारण, शासन या सोहळ्यासाठी करोडो रुपये देतं आणि काही कलाकार फक्त हजेरी लावायला येतात. या पलीकडे काहीच करत नाहीत. संमेलनात अध्यक्षांचं भाषण सुरू असताना अनेक लोक उठून जातात ही गोष्ट एक कार्यकर्ती व सदस्य म्हणून मला पटत नाही. या पुढच्या सगळ्या आयोजकांना एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे, तुम्ही तुमच्या गावात संमेलनासाठी निमंत्रित करताना सर्वप्रथम व्यवस्था चांगली करा. जर व्यवस्था नीट नसेल तर शासन करोडो रुपये देतं त्याचं काय होतं? याचा विचार नक्की केला पाहिजे.” असं मत सविता मालपेकरांनी मांडलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savita malpekar reacted on natya sammelan says there is no facilities for actors sva 00