अभिनेता शुभंकर तावडे हा कायम त्याची फॅशन आणि उत्तम अभिनयामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याच्या आगामी ‘कन्नी’ चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. यानंतर शुभंकरला एक खास कौतुकाची थाप सुद्धा मिळाली आहे. दिग्गज अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या लाडक्या लेकाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्याचा अभिनयाचं कौतुक केलं आहे.

प्रत्येक मुलासाठी त्याच्या बाबाकडून ही खास कौतुकाची थाप मिळणं बेस्ट असतं आणि हेच कौतुक प्रेम शुभंकरला त्याचा बाबा कडून मिळालं आहे. सुनील तावडे हा चित्रपट बघून हसले आणि काही वेळा थोडं भावुकही झाले. त्यांनी आपल्या मुलाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अभिनय विश्वात ही बाप लेकाची जोडी कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी असते आणि चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये देखील या दोघांचा अनोखा बॉण्ड पाहायला मिळाला होता.

आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला त्याच्या लग्नाबद्दल…”

‘कन्नी’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकायला शुभंकर तयार झाला झाला आहे. हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

Story img Loader