डान्सर गौतमी पाटीलचे कार्यक्रम जिथे होतात, तिथून गोंधळ व राड्यांच्या बातम्या येतात. नुकताच उपराजधानी नागपुरात तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तिथेही राडा झाला. गौतमीचा चेहरा दिसत नसल्याचं म्हणत कार्यक्रम पाहायला आलेल्या लोकांनी गोंधळ घातला आणि खुर्च्यांची तोडफोड केली. एकंदरीत गौतमीचा कार्यक्रम आणि गोंधळ यांचं जणू काही समीकरणच झालं आहे. याच मुद्यावरून ज्येष्ठ मराठी अभिनेते राजन पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि तिथे होणारा गोंधळ, पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज याबाबत राजन पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एकूण सात प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नमस्कार मंडळी, या काही प्रश्नांची उत्तरे शोधा.

  1. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञीनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल, मग आत्ताच का?
  2. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते?
  3. जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्पन्नावर आयकर भरते का?
  4. तिच्या उत्पन्नात कोणी सक्षम/सशक्त असामी वाटेकरी आहे का?
  5. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ट पक्षाचा आहे का? की ‘तेलगी’ प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत?
  6. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जातेय अशी इमेज तयार करतायत का?
  7. ‘गौतमीच्या कार्यक्रमात राडा’ यात काही काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का?

असे प्रश्न राजन पाटील यांनी विचारले आहेत. त्यांनी प्रश्नांची उत्तरं शोधा, असं फेसबूक पोस्ट करत म्हटलं आहे.

दरम्यान, “नक्कीच चिंतनीय विषय आहे सर. हल्ली सरळमार्गी माणसाला कायदा पाळावा लागतो. बाकीचे बदमाश सर्व करून प्रतिष्ठेत जगतात.राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य होत नाही,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. आणखी एका युजरने “सवंग प्रसिद्धीसाठी जाहीर वादग्रस्त परिस्तिथी जाणून बुजून निर्माण केली जाते व पैसा छापला जातो हे कलाक्षेत्रात नेहमीच घडते. लोकांनी मूर्ख बनू नये पण ते घडतं हे वास्तव आहे. त्याचाच फायदा हे लोक घेत असतात,” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader