मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते त्यांच्या अभिनयासंदर्भातील अपडेट्स तसेच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असतात. पालक कलाकार असल्याने अनेक सेलिब्रिटींची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण करतात. पण शरद पोंक्षेंची लेक सिद्धी ही वैमानिक झाली आहे.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शरद पोंक्षे यांनी मुलीचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “महिला दिनाच्या शुभेच्छा माझी मुलगी सिध्दी आधी पायलट व काल फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली. स्वकष्टाने, मेहनतीने, कोणाच्याही मदतीशिवाय, तिने हे यश संपादन केलं आहे. एका बापाला आणखी काय हवं? अभिनंदन सिध्दी,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर नेटकरी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी कमेंट्स करून सिद्धी पोंक्षेला शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व शुभेच्छा देणाऱ्यांचे शरद पोंक्षे यांनी आभार मानले आहेत.