लोकसभा निवडणुकांचे निकाल आज (४ जून रोजी) जाहीर झाले. बहुतांशी मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. निवडणुकांच्या निकालांवर अनेक कलाकार व राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. याच दरम्यान, मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.

शरद पोंक्षे यांनी मतमोजणी सुरू असताना ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी निवडणुकांचा उल्लेख केला नसला तरी त्यावर असलेल्या कमेंट्सवरून ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली पोस्ट असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी अगदी मोजक्या शब्दांची फेसबुक पोस्ट केली आहे.

How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया

स्वा. सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं “मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे ठाकतात,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी फेसबूकवर केली आहे. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

शरद पोंक्षे यांची पोस्ट

“लोकांनी किती मोठी चूक केली हे कळेल साहेब बोलून काही फायदा नाही, चुकून ही एकत्र आलेले सर्व पक्षाचं सरकार आलं तर परत सर्व सुरु होईल जर हेच हवं असेल तर ह्यातून ह्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. नंतर वेळ निघून गेल्यावर वाचवा वाचवा ओरडत फिरतील. देव करो मोदी सरकार परत यावं आणि ह्या देशाला वाचवावं, आणि बीजेपीने फोडाफोडीचं राजकारण कमी करून योग्य ते कराव त्याचा फटका जास्त बसला आहे हे कळवा,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर, “शरदजी कसे आहे नैतिकता सोडून आचरण झाल की हिंदू हिंदूच्या विरोधात उभे ठाकणारच महाभारता मधे तर भाऊ भावा विरोधात होते तिथं श्रीकृष्ण देव सुद्धा नैतिकतेच्या बाजूने उभे होते महाराष्ट्र चे गळीच्छ राजकारण देशभर उमटले,” अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे.

राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”

निकालांबद्दल बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रातील ४८ जागांवरील निकालांची घोषणा झाली आहे. राज्यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत, तर एका जागेवर अपक्ष आमदाराचा विजय झाला आहे. दुसरीकडे देशात २९२ जागांवर एनडीए, २३२ जागांवर इंडिया आघाडी व १९ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले आहेत.