ज्येष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. ते व्याख्यान करतात, त्यांच्या व्याख्यानात ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. आता या टीकेवर त्यांनी भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली. आपण १३ वर्षांची शिवाजी महाराजांना आदराने कसं बोलणार, असं ते म्हणाले.

“आपल्या घरात कितीही कचरा असला तरी…”, किरण मानेंची शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी पोस्ट, म्हणाले “तू त्यांना खोटं हसत…”

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”

भागर्वीने शेअर केलेल्या एका शॉर्ट व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, “ए पोंक्ष्या, तू काय तुकाराम म्हणतो का रे, जगदगुरू बोल. नुसतं शिवाजी म्हणतोस का रे, आता लहानपणचा १३ वर्षांचा शिवाजी…तर त्याला १३ वर्षांचे गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रीय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज की जय यांना जीजाबाईंनी घोड्यावर बसायला शिकवलं, असं म्हणणार का आपण? त्यांनी शिवबाला बसवलं घोड्यावर, तलवारबाजी शिकविली. ते छत्रपती झाल्यानंतरही त्यांच्या स्वराज्यातील सामान्य बायका ‘माझा शिवबा, माझा शिवबा’ असंच म्हणायच्या.”

पुढे त्यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख केला आणि आपण आपुलकीने त्यांना एकेरी संबोधत असतो, असं ते म्हणाले. “आपण भारतरत्न लता मंगेशकर काय अप्रतिम गातायत असं प्रत्येकवेळी म्हणतो का? लता काय गाते यार, असं म्हणतो. म्हणजे आपण त्यांचा अपमान केला का? काय तेंडल्या (सचिन तेंडुलकर) खेळतो रे, भारतरत्न आहे तो पण आपण तेंडल्या म्हणतो. याचा अर्थ हा अपमान असतो का? तर हे समजायची कुवत नाही समोरच्यांची,” असं ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात.

Story img Loader