शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळी येथील डोममध्ये पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली होती. ते मंचावरून हिंदुत्वाबद्दल भाषण करत होते, पण भाषण सुरू असतानाच त्यांना ते लवकर आटोपण्याची चिठ्ठी आली आणि मग शरद पोंक्षे यांनी नाराजी व्यक्त केली.

शरद पोंक्षे भाषणाची सुरुवात करत म्हणाले, “या देशातले पहिले हिंदू हृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ५८ वर्षांपूर्वी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना झाली. ही स्थापना का झाली हे आठवण्याची फार गरज आहे, कारण नंतर संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झालं आणि संघटनेची मुळ उद्दीष्टे आपण विसरून गेलो, असं मला वाटतं. आजचा हा दिवस हा शिवसेना राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाही तर हा दिवस शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेचा वर्धापन दिन आहे. जोपर्यंत आपण सत्तेत येत नाही, तोपर्यंत आपण परिवर्तन करू शकणार नाही म्हणून पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याची निवडणूक लढवली आणि तिथून संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झालं आणि मग आपण प्रचंड स्थित्यंतरं पाहिली.”

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशा, सहा दिवसांत कमावले फक्त…

सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण धर्मच विसरलो

पुढे ते म्हणाले, “१९ जून १९६६ या वर्षात काय काय घडलं…या हिंदुस्थानातला पहिला हिंदू हृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं २६ फेब्रुवारी १९६६ ला निधन झालं आणि त्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्या हिंदू हृदयसम्राटाचा जन्म झाला हा तो दिवस. तिथीनुसार आज छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदुत्वासाठी कसं जगावं ते शिकवलं आणि संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी कसं मरावं ते शिकवलं. पण आपण आज सगळं विसरून गेलो आहोत. सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण धर्मच विसरलो.”

ट्रेनमध्ये पहिली भेट अन् लग्नाचा निर्णय, आजही पतीपासून दूर राहतात अलका याज्ञिक; वाचा हटके लव्ह स्टोरी

सेक्युलरिझमचा खरा अर्थ माहित असणारे फार कमी नेते

पुढे ते म्हणाले, “गेल्या दोन वर्षात फार गमती-जमती बघायला मिळाल्या. आमचं हिंदुत्व-तुमचं हिंदुत्व.. पण हिंदुत्व म्हणजे काय हे एकालाही माहित नाही. भारतातील परिस्थिती फार गंभीर आहे. एक अख्खा देश आपण इस्लाम धर्माच्या नावाखाली १९४७ ला देऊन टाकला, पण उरलेलं राष्ट्र मात्र हिंदू राष्ट्र होऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये सेक्युलरिझम घुसवला गेला. मुळात सेक्युलरिझमचा खरा अर्थ माहित असणारे फार कमी नेते असतील. हिंदुत्व आणि सेक्युलरिझम वेगळे काढताच येणार नाही. पण मुळात आम्हाला धर्म माहीत नाही. धर्म म्हणजे काय हे कळेल तेव्हाच मग हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्म काय हे कळू लागले. त्याआधी धर्म शब्दाची व्याख्या कळली पाहिजे. हिंदू या शब्दातच सेक्युलरिझम दडलेला आहे. त्यामुळे मी हिंदुत्तववादी आहे हे म्हटल्यावर मी सेक्युलर आहे हे वेगळं पटवून द्यायची गरज नाही. “

ज्याठिकाणी वडील होते वेटर, त्या तिन्ही इमारतींचा मालक आहे सुनील शेट्टी; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

“धर्माला इंग्रजीत रिलीजन म्हणतात. रिलीजन म्हणजे धर्म नाही, ते म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई वैगेरे वगैरे. हा देश निधर्मी आहे? निधर्मी कसा असू शकतो. या जगात निधर्मी काहीच नाही,” असं शरद पोंक्षे म्हणाले.

जे इतिहास विसरतात, त्यांचा भुगोल बिघडतो

“छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, कुठले सेक्युलर? ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, हिंदू धर्माच्या पुनरुत्थनासाठी धडपडत होते. घरवापसी हे भाजपा व आरएसएसने सुरू केलेलं नाही हे शिवाजी महाराजांनी सुरू केलं होतं. इस्लाममध्ये गेलेल्या लोकांना आपल्या धर्मात विधिवत घेण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. सावरकर म्हणतात जे इतिहास विसरतात, त्यांचा भुगोल बिघडतो. आम्ही इतिहास विसरलो.. पुढचं बघा, पुढचं बघा म्हणण्याच्या नादात आम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ गमावलं,” असं शरद पोंक्षे म्हणाले.

रितेश-जिनिलीया, कतरिना-विकी अन्…; सोनाक्षी सिन्हाआधी ‘या’ स्टार्सनी निवडले दुसऱ्या धर्मातील जोडीदार

भाषणात चिठ्ठी आली अन्…

हेच बोलताना एक चिठ्ठी आली आणि पोंक्षे म्हणाले, “किती वेळात संपवायचं, वेळ संपली बरं… हे असं होतं म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही. हिंदू धर्म समजून घ्या मित्रांनो. माझ्यानंतर जे बोलणारे आहेत, थोडासा वेळ आहे का? म्हणजे मी हे एवढं तरी पूर्ण करतो. कारण काय आहे ना हा विषय असा पाच मिनिटांत शुभेच्छा देण्यात मला इंटरेस्ट नाही. तुमच्या सर्वांची अनुमती असेल तर मी बोलू? बोलू ना? जास्त वेळ नाही घेणार,” असं म्हणत त्यांनी त्यांचं भाषण पूर्ण केलं.