वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवारी (२२ मार्च रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डाने सावरकरांची भूमिका साकारली आहे, तसेच चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने केलं आहे. या चित्रपटाविषयी मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे.
शरद पोंक्षे यांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं, “प्रत्येकाने पहायला हवा. मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडीओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत, तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच.”
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याबाबत सॅकनिल्कने आकडेवारी जाहीर केली आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची सुरुवात सामान्य झाली आहे, त्यामुळे शनिवार व रविवार वीकेंड आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात रणदीप हुड्डा वीर सावरकरांच्या भूमिकेत आहे, तर अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटावर रणदीप हुड्डा मागच्या काही वर्षांपासून काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रणदीपने खूप मेहनत घेतली आहे.