मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी महिला दिनानिमित्त मुलगी सिद्धीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुकास्पद कमेंट्स केल्या होत्या, तर काहींनी शरद पोंक्षे यांच्यावर टीका केली, त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातल्या काही कमेंट्सना शरद पोंक्षे यांनी उत्तरं दिली. त्यापैकी त्यांच्या एका उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे.

काय होती शरद पोंक्षे यांची पोस्ट?

“महिला दिनाच्या शुभेच्छा माझी मुलगी सिध्दी आधी पायलट व काल फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली. स्वकष्टाने, मेहनतीने, कोणाच्याही मदतीशिवाय, तिने हे यश संपादन केलं आहे. एका बापाला आणखी काय हवं? अभिनंदन सिध्दी,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी महिला दिनाच्या दिवशी केली होती.

sharad ponkshe
शरद पोंक्षे यांनी मूळ पोस्ट (फोटो – फेसबुकवरून स्क्रीनशॉट)

कमेंट व त्यावर शरद पोंक्षे यांनी दिलेलं उत्तर

“पोंक्षे साहेब…माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्रत्येक गोष्ट शिकताना आपल्याला कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते. तुमच्या कन्येला देखील प्रशिक्षण काळात शिक्षकांची गरज लागलीच असेल…असूद्या त्या शिक्षकांचे आम्ही आभार मानतो. “तुम्ही खरंच शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” God bless you”, अशी कमेंट एका युजरने केली होती. त्यावर शरद पोंक्षेंनी “मराठी भाषा तुम्हाला कळत नाही, असं दिसतंय. असो शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. शुद्र कोण?” असं उत्तर दिलं.

sharad ponkshe
शरद पोंक्षे यांच्या पोस्टवरील कमेंट्स (फोटो – फेसबूक स्क्रीनशॉट)

दरम्यान, शरद पोंक्षे यांनी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी शरद पोंक्षे यांच्या लेकीचं या कामगिरीसाठी कौतुक केलं आहे.

Story img Loader