शरद पोंक्षे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या व्याख्यानामुळेही चर्चेत असतात. त्यांची नुकतीच दिलेली एक मुलाखत चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीत त्यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाबद्दल सांगितलं आहे. नाटकाला विरोध झाला, तत्कालीन केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आपल्यासाठी उभे राहिले होते, असं शरद पोंक्षेंनी सांगितलं. ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टने त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”
शरद पोंक्षे म्हणाले, “चालू नाटकात १००-१५० माणसं अचानक दरवाजे उघडायचे आणि काँग्रेसची १००-१५० माणसं घुसायची हे अनेक वेळा घडलंय. ते स्टेजवर यायचे, मला घेराव घालायचे, माझ्या तोंडाजवळ येऊन ‘मारेन तुला’ म्हणत खूप गलिच्छ शिव्या द्यायचे. नंतर नाटकातील लोक मला तिथून आत बोलवायचे, ‘ते तुला मारतील’ असं म्हणायचे. मी म्हणायचो कोणी मारत नाही मला. ते इथपर्यंत येऊन जाणार, त्यांच्या कुणाची हिंमत नाही मला मारायची.”
“बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत”, शरद पोंक्षेंचे वक्तव्य; म्हणाले, “गौतम बुद्ध…”
पुढे ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा निवडणुका व्हायच्या, तेव्हा तेव्हा नाटकाला विरोध व्हायचा. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक मुद्दा असायचा की नथुरामच्या प्रयोगाला आम्ही विरोध केला. पण कुणालाच काही माहीत नाही, आपल्याकडे इतिहासाबद्दल शून्य माहिती आहे, वाचन तर नाहीच आहे. त्यामुळे फक्त विरोधासाठी विरोध करत राहायचं इतकंच. नंतर केंद्र सरकारने नाटकावर बंदी घातली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. ‘नथुराम हा देशभक्तच आहे, नथुराम महाराष्ट्रात बोललाच पाहिजे,’ हे ते भाषणातही बोलले होते. ते बाळासाहेब ठाकरे होते, तो करिश्माच वेगळा होता. कारण माझ्याकडे कोणती संघटना नाही, माझ्या पाठिशी कोणी नव्हतं, फक्त बाळासाहेबांची तेव्हाची खरी शिवसेना होती, तीच होती.”